/* */
सोमवार, 29 मे 2023
लक्षवेधी :
  गण्यारपवार मारहाण प्रकरण: गावात येऊन बयाण घेण्याची साक्षदारांची मागणी             थेट बंगल्यावर जाऊन न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे निलंबित             चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याचे प्रथमवर्ग न्यायालयाचे आदेश             चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ या नाट्यपुस्तकाचे २८ ला प्रकाशन              गडचिरोली जिल्ह्यातील तीन एसडीपीओंच्या बदल्या, पिपंरी चिंचवडचे सहआयुक्त प्रशांत अमृतकर गडचिरोलीचे नवे एसडीपीओ           

आर्किटेक्ट सुरेश रामटेके आशिया पॅसिफिक एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित

Tuesday, 21st October 2014 08:10:30 AM

 
गडचिरोली, ता़२१
येथील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आणि इंजिनिअर सुरेश रामटेके यांनी गडचिरोलीसारख्या मागास व आदिवासीबहुल जिल्ह्यात इंजिनिअरिंग आणि व्हॅल्यूएशनच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना नवी दिल्ली येथील आॅल इंडिया नॅशनल युनिटी कॉन्सिलतर्फे आशिया पॅसिफिक एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले़ 
नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत नेपाळचे वित्तमंत्री डॉ़रामसरण महत, माजी केंद्रीय मंत्री व राज्यपाल डॉ़ भिष्मनारायण सिंह व डॉ़जी़एऩसरस्वती यांच्या हस्ते सुरेश रामटेके यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ ११ आॅक्टोबर २०१४ रोजी हा कार्यक्रम पार पडला़ श्री़ रामटेके यांना इंडो-नेपाल इंटिग्रेशन अ‍ॅन्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे प्रशस्तीपत्रही देण्यात आले़ या परिषदेतला देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचाही गौरव करण्यात आला़
आर्किटेक्ट सुरेश रामटेके हे मागील तीस वर्षांपासून गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात आर्किटेक्ट, इंजिनिअरिंग व व्हॅल्यूएशनच्या क्षेत्रात तांत्रिक सेवा देत असून, जिल्ह्यात बरीच विकास कामे केली आहेत़ या पुरस्कारामुळे आपणास आनंद झाला असून, हा गडचिरोली जिल्ह्याचा गौरव असल्याची प्रतिक्रिया सुरेश रामटेके यांनी व्यक्त केली़ या पुरस्काराबद्दल श्री़रामटेके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
34VMU
  © 2014 - 2023 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना