शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

‘नीट’ परिक्षेत यशस्वी वैभव नैतामचा सत्कार

Saturday, 17th October 2020 01:11:07 AM

गडचिरोली,ता.१७: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक ‘नीट’ परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल लांजेडा येथील रहिवासी वैभव नैताम याचा नगरसेवक संजय मेश्राम यांनी सत्कार केला.

‘नीट’ परिक्षेचा निकाल काल जाहीर झाला. त्यात वैभव गजानन नैताम यास ७२० पैकी ६१४ गुण मिळाले. या यशाबद्दल नगरसेवक संजय मेश्राम, माजी सभापती अजय भांडेकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर भांडेकर यांनी वैभव नैतामचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. वैभवचे प्राथमिक शिक्षण रामनगर येथील शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण शिवाजी हायस्कूल, तर बारावीपर्यंतचे शिक्षण शिवकृपा कनिष्ठ महाविद्यालयात झाले. दहावीच्या परिक्षेत त्याला ९२.८ टक्के, तर बारावीच्या परिक्षेत ८५ टक्के गुण मिळाले होते.

एमबीबीएस केल्यानंतर यूपीएससी परिक्षेची तयारी करुन आयएएस होण्यास मानस वैभवने व्यक्त केला. वैभवचे वडील गजानन नैताम हे शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UCN65
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना