शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

महागावच्या आशा वर्कर रुखसार शेख राज्यातून सातव्या पुरस्काराच्या मानकरी

Sunday, 13th December 2020 05:50:08 AM

गडचिरोली ता.१३: अहेरी तालुक्यातील महागाव येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात कार्यरत आशा वर्कर रुखसार मुस्तफा शेख यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्कृष्ट काम केल्याबद्दल गौरव केला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी एक यादी जाहीर केली, त्यात रुखसार शेख यांना राज्यातून सातव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. श्रीमती. रुखसार शेख यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आशा योजनेच्या कामासोबतच कोरोनासारख्या साथीच्या रोगातदेखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेच्या सर्वेक्षणातही त्यांनी ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेवर पूर्ण केले आहे. रुखसार शेख यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बनसोडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री, जिल्हा समूह संघटक धीरज सेलोटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
56IH0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना