शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

शिवसेना ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढणार: एकनाथ शिंदे

Monday, 21st December 2020 06:40:02 AM

गडचिरोली,ता.२१: संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार असून, शिवसैनिकांनी एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आज फंक्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्री.शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकार अनेक लोकोपयोगी योजना राबवीत असून, त्या जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. प्रत्येक ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता प्रस्थापित करायची आहे. निवडणूक निकालानंतर आघाडीतील घटक पक्षांशी युती करण्याचे मार्ग मोकळे राहतील, असेही श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

प्रारंभी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, जिल्हा संघटक विलास कोडाप, किरण पांडव, विलास ठोंबरे, डॉ.अश्विनी धात्रक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EZTYH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना