शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बलात्कार करणाऱ्या पोलिस शिपायास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Tuesday, 12th January 2021 08:42:09 AM

गडचिरोली,ता.१२: युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी अतिप्रसंग करणाऱ्या एका पोलिस शिपायास जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व ८० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनोद शांताराम बावणे(३५)रा.आरमोरी असे शिक्षा झालेल्या दोषी पोलिस शिपायाचे नाव आहे. 

२०१० मध्ये पीडित मुलगी ही दहाव्या वर्गात शिकत असताना विनोद बावणे याचे तिच्याशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून १८ मार्च २०११ रोजी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधाचे त्याने व्हीडिओ शूटींगही करुन ठेवले. ही शूटींग तुझ्या आई-वडिलांना दाखवतो, असे धमकावून विनोद बावणे पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. जेव्हा पीडित मुलीने विनोदला लग्न करण्याची विनंती केली, तेव्हा ती धुडकावून लावत त्याने ६ मे २०१५ रोजी दुसऱ्या युवतीशी लग्न केले. यामुळे पीडित मुलीने २५ ऑगस्ट २०१५ रोजी आरमोरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनोद बावणे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६(२), ५०६ अन्वये २९ ऑगस्ट २०१५ रोजी गुन्हा दाखल केला.

तपास पूर्ण झाल्यानंतर तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक शरद पाटील यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज या खटल्याचा निकाल लागला. पीडित मुलगी व साक्षदारांचे बयाण नोंदवून, तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी विनोद बावणे यास १० वर्षांचा सश्रम कारावास व ८० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिवाय दंडाच्या रकमेतील ७५ रुपये भरपाई पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने बजावले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक नारायण बच्चलवार यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4Q3ZX
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना