शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

युवक काँग्रेसने केलेली रुग्णसेवा कौतुकास्पद: आ.नाना पटोले

Tuesday, 8th June 2021 02:09:06 AM

गडचिरोली,ता.८:  कोरोना विषाणूच्या संसर्गकाळात टाळेबंदीमुळे रुग्णांची होरपळ होत होती. अशा संकटाच्या काळात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी भोजनदान केले. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असून, रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा होय, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित उपक्रमात नाना पटोले यांनी सहभागी होऊन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना चहा व बिस्कीट वितरित केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, आ. अभिजित वंजारी, माजी खासदार मारोतराव कोवासे,माजी आ. डॉ अविनाश वारजूरकर , प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, गिरीश पांडव, विनोद दत्तात्रय, रवींद्र दरेकर,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, विश्वजित कोवासे,रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर,प्रतीक बारसिंगे,संजय चन्ने ,तोफिक शेख,गौरव ऐनप्रेड्डीवार,विपुल येलेटीवार ,दिलीप चॊधरी,मिलिंद खोब्रागडे, पिंकू बावणे,नितीन घुले उपस्थित होते.

मागील ५० दिवसांपासून युवक काँग्रेस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन, चहा व बिस्कीट वाटप करीत आहे. शिवाय, गरजूंना रक्त, रुग्णवाहिका व बेडची व्यवस्थाही करीत आहे.  कोरोना संसर्गाच्या काळात सर्वसामान्य जनता घाबरलेली असताना युवक काँग्रेस जनसेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक शब्दात करताच येऊ शकत नाही, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A6OQ4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना