शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल महिलेचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Friday, 18th June 2021 01:48:42 AM

गडचिरोली,ता.१८: सुमारे २ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षल महिलेने आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. करिश्मा उर्फ गंगा उर्फ सविता अजय नरोटी(२०), असे आत्मसमर्पण करणाऱ्या महिला नक्षलीचे नाव आहे. ती नक्षल्यांच्या चातगाव दलमची सदस्य असून, छत्तीसगड राज्यातील पाखांजूर तालुक्यातील बेटिया गावची रहिवासी आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयात केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक मानस रंजन व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत करिश्माने आत्मसमर्पण केले. तिच्यावर चकमकीचे ४ गुन्हे दाखल असून, शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नक्षल्यांनी विकासकामांत आडकाठी न आणता आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पोलिस उपमहानिरीक्षक मानस रंजन व पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यावेळी केले.

२०१९ ते २०२१ पर्यंत ३८ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. त्यात ४ विभागीय समिती सदस्य, २ दलम कमांडर, ३ उपकमांडकर, २८ सदस्य व १ जनमिलिशिया सदस्याचा समावेश आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HHE5B
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना