शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पोलिस शिपायाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

Thursday, 24th June 2021 12:46:59 AM

गडचिरोली,ता.२४: अहेरी येथील धर्मपुरी वॉर्डात एका पोलिस शिपायाने आपल्या सासऱ्याची गोळी झाडून हत्या केल्याची घटना काल(ता.२३) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. मारोती मट्टामी असे मृत इसमाचे, तर मनोज गावडे असे आरोपी पोलिस शिपायाचे नाव आहे.

मनोज गावडे अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात कार्यरत आहे. धर्मपुरी वॉर्डात तो आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. काल मनोजचे सासरे मारोती मट्टामी हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. रात्री जावई मनोज गावडे व सासरे मारोती मट्टामी यांच्यात वाद झाला. राग अनावर झाल्याने मनोज गावडे याने त्याच्याकडील सर्व्हीस रायफलमधून मारोती मट्टामी यांच्यावर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मनोज गावडे याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1D58E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना