शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीच्या परिचारिका शालीनी कुमरे यांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

Thursday, 16th September 2021 07:19:18 AM

गडचिरोली,ता.१६:  आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या देशभरातील ५१ परिचारिकांना बुधवारी(ता.१५) सांयकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय २०२० च्या राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील दोन परिचारिकांचा समावेश असून, गडचिरोली येथील परिचारिका शालीनी नाजुकराव कुमरे यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.

पदक, प्रशस्तीपत्र आणि ५० हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १९७३ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. १२ मे हा दिवस ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’यांचा जन्मदिन असून, तो ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’म्हणून साजरा केला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे त्यावेळी हा कार्यक्रम होऊ शकला नाही.  बुधवारी दुरस्थ प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय आरोग्य तथा कुंटुब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार या उपस्थित होत्या.

जिल्हा सामान्य रूग्णालय, गडचिरोली येथील आंतर रूग्ण विभागाच्या परिचारिका शालिनी नाजुकराव कुमरे  यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा परिचारिका क्षेत्रातील ३५  वर्षाचा अनुभव आहे. श्रीमती कुमरे यांनी आपले काम पूर्ण क्षमतेने पार पाडले. आपत्कालिन जीवन रक्षात्मक प्रणाली  त्यांनी सक्षमपणे सांभाळली असून, नक्षलग्रस्त भागात चांगली कामगिरी बजावली आहे. आरोग्य क्षेत्रातील अतिशय महत्वाचा भाग असणाऱ्या  ‘अवयव दान’ क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. आता त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील खुर्द येथील उपकेंद्रातील प्रेमलता संजय पाटील या ऑग्जिलिएरी नर्स मिडवाइव्स (एएनएम) आहेत. मागील १४ वर्षांपासून त्या आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. श्रीमती पाटील महिलांना समुपदेशन करण्याचे काम उत्तम प्रकारे पार पाडतात. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातंर्गत असणारी कामे त्यांनी चोख पार पाडली आहेत, त्यांच्या या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
O69R6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना