शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आदिवासी वनवासी नव्हेत; तर मूळनिवासी: शरद पवार

Thursday, 18th November 2021 07:59:34 AM

गडचिरोली,ता.१८: भाजपप्रणित संघटनांचे लोक आदिवासींचा ‘वनवासी’ असा उल्लेख करतात. मात्र, ते मूळनिवासी असून, त्यांच्या प्रगतीसाठी देशाचे धोरण वेगळे असले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आज देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल, सुबोध मोहिते, आ.धर्मरावबाबा आत्राम, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी खासदार मधुकर कुकडे, सुनील फुंडे, भाग्यश्री आत्राम उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करतात, हा इतिहास केवळ आदिवासी समाजाचाच आहे. परंतु देशात भाजपची सत्ता आल्यापासून ते आदिवासींना गौण दर्जा देत आहेत. पंतप्रधानांनी आदिवासी संमेलनात वनवासी असा शब्द वापरला. परंतु ते मूळनिवासी आहेत. जल, जंगल आणि जमिनीचे किंबहुना एकूणच पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे काम आदिवासींनी केले आहे. त्यामुळे आदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असला पाहिजे.

त्रिपुरा घटनेनंतर राज्याच्या काही भागात हिंसाचार झाला. भाजपची मंडळी तेल ओतून जातीयवाद वाढविण्याचे काम करीत आहेत, अशी टीका पवार यांनी केली. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची लोकसंख्या ३५ कोटी आणि शेतकऱ्यांचे प्रमाण ८० टक्के होते. आज देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी झाली असून, शेती कसणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्कयांवर आले आहे. एकंदरित शेतीवरचा भार अडीच टक्यां्यनी वाढला आहे. त्यामुळे शेती कसणाऱ्यांना मदत केली पाहिजे, असे पवार म्हणाले. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी दिला पाहिजे. वेळप्रसंगी सरकारने कर्ज काढावं; पण शेतकऱ्यांना मदत करावी, असे पवार म्हणाले.

भाजप नेते नाना नाकाडे यांच्यासह अनेक जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

याप्रसंगी भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते नाना नाकाडे, कुरखेडा तालुक्याचे माजी अध्यक्ष राम लांजेवार, आरमोरी तालुक्याचे माजी महासचिव सुनील नंदनवार, देसाईगंजचे माजी तालुकाध्यक्ष संजय साळवे, आरमोरीचे माजी शहराध्यक्ष प्रदीप हजारे, स्वीकृत नगरसेवक माणिक भोयर, कुरखेडा तालुका अल्पसंख्याक आघाडीचे माजी अध्यक्ष युसुफ पठाण, कोरची तालुक्यातील ज्येष्ठ नेते विनोद कोरेटी, आदिवासी आघाडीचे माजी जिल्हा सरचिटणीस सुभाष नैताम यांच्यासह पाच सरपंचांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6J32E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना