बुधवार, 26 जानेवारी 2022
लक्षवेधी :
  दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मूल्ये आणि विकासाला अंगीकारल्याने गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती बदलत आहे: प्रजासत्ताकदिन कार्यक्रमात राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन             गडचिरोली जिल्ह्यातील ७ पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तर दोन अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस पदक जाहीर             लसीकरणात गडचिरोली जिल्हयाची ३१ व्या क्रमांकावरून १६ व्या क्रमांकावर झेप-आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी केले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक             गडचिरोलीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा, नवमतदारांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वाटप             २५ जानेवारी कोरोना अपडेट:गडचिरोली जिल्हयात ४३ जण बाधित, २०१ रुग्ण कोरोनामुक्त           

एबी फार्मवरुन स्फोट: कुरखेडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Tuesday, 7th December 2021 01:26:03 AM

गडचिरोली,ता.७: नगर पंचायत निवडणुकीत भाजपातून आलेल्या कार्यकर्त्यांना झुकते माप दिल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. आता ही मंडळी वेगळे उमेदवार उभे करणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे.

कुरखेडा नगरपंचायत निवडणुकीत सन्मानजनक आघाडी न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडून सर्व १७ ही प्रभागांमध्ये आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुढे तिकिट वाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले. आपल्याला विश्वासात न घेता वरिष्ठांनी एबी फार्म वाटप केल्याने संतापलेले तालुकाध्यक्ष जवाहर सोनकुसरे यांच्यासह शहराध्यक्ष सरफराज शेख, शहर कार्याध्यक्ष पंकज डोंगरे, विधानसभा सरचिटणीस रमेश रासेकर, विधानसभा उपाध्यक्ष ईश्वर ठाकूर, विधानसभा सचिव अरुण नैताम या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे संयुक्त राजीनामा सुपूर्द केला असून, आम्ही ठरविलेले उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढतील, असे जाहीर केले आहे. यामुळे कुरखेडा तालुक्यात आधीच कमकुवत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा अस्ताच्या दिशेने वाटचाल करु लागल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात मृतपाय झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले. परंतु उमेदवार ठरविण्याचे अधिकारही आपल्याला देण्यात आले नाही. भाजपमधून आलेल्या लोकांना अवास्तव महत्व देण्यात येत असल्याने आम्ही आपापल्या पदांचे राजीनामे देत आहोत. आमचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढतील, असेही राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
71V0P
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना