/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२२: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता ५ वीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता ८ वीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलै २०२२ रोजी घेण्याचे प्रस्तावित केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे. त्याकरिता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी २३ एप्रिल ते ३० एप्रिल २०२२ हा कालावधी आहे. तसेच शुल्क भरण्याची अंतिम तारीख २ मे २०२२ ही आहे.
त्यामुळे संबंधितांनी कोणत्याही परिस्थितीत ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन आवेदनपत्र भरावे. शिवाय २ मे नंतर शुल्क भरता येणार नाही, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. …