/* */
सोमवार, 8 ऑगस्ट 2022
लक्षवेधी :
  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कोरचीत १७ पैकी १३ प्रभारी अधिकारी करणार ध्वजारोहण             महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची गडचिरोलीत रॅली             चामोर्शी पंचायत समितीतील आरोग्य सेवक एसीबीच्या जाळ्यात: कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी इसमाकडून स्वीकारली साडेतीन हजार रुपयांची लाच             सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी             निकृष्ट तांदूळ प्रकरण: अहवाल न दिल्याने राज्य शासनाने डीएसओला खडसावले             गडचिरोली येथे आरमोरी रोड आणि कारमेल हायस्कूलच्या मागे दोन प्रशस्त घरे विकावयाची आहेत: संपर्क: ९४०५१४३६७०           

पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचे गडचिरोलीत पडसाद:शिवसैनिकांची निदर्शने

Sunday, 26th June 2022 06:51:28 AM

गडचिरोली,ता.२६: राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्याचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यातही उमटू लागले असून, शिंदे आणि अन्य बंडखोर आमदारांच्या विरोधात आज शिवसैनिकांनी गडचिरोलीत निदर्शने करुन त्यांचा निषेध केला.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार आणि विलास कोडापे यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली. शेकडो शिवसैनिकांनी कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातून रॅली काढून इंदिरा गांधी चौकात शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी मायेची उब देऊन अनेक शिवसैनिकांना आमदार आणि मंत्री बनविले. एकनाथ शिंदे हेदेखील त्यातीलच आहेत. परंतु शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हे कृत्य कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा अरविंद कात्रटवार आणि विलास कोडापे यांनी दिला.

या आंदोलनात जिल्हा संघटक विलास ठोबरे,ज्ञानेश्वर बगमारे,यादव लोहबरे, संदीप भुरसे, गणेश दहलाकर,संजय बोबाटे, नानाजी काळबांधे,शामराव कुकुड़कर, अरुण बारापात्रे, निकेश लोहबरे, स्वप्निल खांडरे, राहुल सोरते,प्रशांत ठाकूर,राजू जवादे,अमित बानबले,दिलीप चनेकर,चुकराम मुंघाटे,सूरज उइके,संदीप अलबनकर, उमाजी चनेकर,मनोहर लाजुरकर,संदीप चनेकर,विलास वासेकर, गजानन भांडेकर,त्र्यंबक फुलझेले, तुकाराम फुलझेले, श्रीकांत शेजारे,सुनील रंदये,महेंद्र शेजारे,विकास वट्टी,रामराव वट्टी,प्रशांत सिडाम, सुधीर सिडाम, अनिकेत उंदिरवाडे, संतोष वसुनाके,रमेश चंद्रगिरी,चंद्रकांत मस्के, विशाल शेडमाके,मुखरू वट्टी,दिलीप वहलादे,बालकृष्ण येलमुले,अमित हुलके, लोमेश सेलोटे,अभिषेक सेलोटे,हरबा दाजगये, माणिक ठाकरे, जगन चापले, रामदास भयाल,यशवंत लाकुड़वाहे,निरंजन लोहबरे, कैलास आवारी, मनोज ठाकूर,यादव चौधरी, परवीन निसार, प्रशांत ठाकूर , संतोष कुसनाके, दिनेश गिरोले, सुधीर सिडाम, पंकज टिकले, रूपेश कोसमसिले, पूरण उंदिरवाड़े, प्रज्वल चंद्रगिरे, मिलिंद राउत, दिगांबर कारते, अविनाश उंदिरवाड़े, मारोती गुरनुले, बंडू जेंगठे, दामोदर जेंगठे,गिरीधर मोहुर्ले, ललीत भेंडारे, निर्मल वाढई, अण्णा मड़ावी, रितेश सहारे, अंकुश गावतुरे, जितू गावतुरे, उमाकांत जेंगठे , मुकेश गुरनुले, गणेश दहेलकर, यादव चौधरी, मनोहर ठाकरे ,मधुकर गेडाम,जयेंद्र चनेकार, उमाजी पानसे , किशोर दहेलकर, नामदेव नैताम, प्रवीण पानसे, निंबाजी तिवाडे, जीवन मलोटे, भुजंग गेडाम, कैलास आवारी , जीवन कुरुडकर, माधव चौधरी, बाळकृष्ण येलमुले, दिलीप वलादे, कवडू धंदरे, विश्वनाथ धंदरे, अमित हुलके , लोकेश सेलोटे, आशिष सेडमके, गुरुदेव सेलोटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
447Z1
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना