/* */
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022
लक्षवेधी :
  वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार: पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत देलोडा गावानजीकच्या जंगलातील घटना             रक्तदान शिबिराद्वारे महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्षपदाची वर्षपूर्ती साजरी             आरमोरीजवळच्या गाढवी नदीच्या पुलावर अपघात: गडचिरोलीचे आ.डॉ.देवराव होळी थोडक्यात बचावले             चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या: कोवानटोला-जपतलाई येथील घटना             एटापल्ली तालुक्यातील संतापजनक घटना: ५० वर्षीय आदिवासी महिलेवर ट्रकचालकाने केला बलात्कार, आरोपीस अटक             गडचिरोली: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार- शिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांचे प्रतिपादन           

नक्षल्यांनी केली माजी सरपंचाची हत्या

Wednesday, 20th July 2022 08:19:28 AM

गडचिरोली,ता.२०: सशस्तर नक्षल्यांनी आज दुपारी भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील एका इसमाची गळा चिरुन हत्या केली. रंगा मडावी(५०) असे मृत इसमाचे नावे आहे.

रंगा मडावी हे आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मन्नेराजाराम येथून मडवेली येथे मोटारसायकलने जात असताना वाटेत नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जागीच गतप्राण झाले. मडावी हे मन्नेराजाराम ग्रामपंचायतीचे दहा वर्षे सरपंच होते. त्यांच्या हत्येचे कारण कळू शकले नाही. दामरंचा उपपोलिस ठाण्यातील पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

एप्रिल २०२२ मध्ये मन्नेराजाराम गावाजवळच्या गेर्राटोला येथील मीना सिडाम या युवतीची हत्या करुन तिचा मृतदेह एका नाल्यात पुरण्यात आला होता. या विरोधात भामरागड तालुक्यातील आदिवासींनी मोठे आंदोलन करुन तीव्र संताप व्यक्त केला होता. मीना सिडाम हिच्या खुनात सरपंच रंगा मडावी यांचा मुलगा अविनाश मडावी याचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली होती. या घटनेची प्रतिक्रिया म्हणून नक्षल्यांनी रंगा मडावी यांची हत्या केली असावी, असा अंदाज आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U6EAG
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना