/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.६: जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. परंतु केंद्र व राज्य सरकारने मदत न केल्याचा निषेध करीत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी शिवणी येथील बांधावर जाऊन मुंडन करवून घेतले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व मेडिगड्डा धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या प्रचंड विसर्गामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार आणि तिबार पेरणीची वेळ आली. परंतु सरकारने शेतकऱ्यांना आश्वासनापलीकडे काहीच दिले नाही, असा आरोप करीत कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मुंडन केले.
यावेळी किसन उडाण, सदाशिव सातपुते, गजानन बालापुरी, विठोबा उडाण, राजू मेश्राम, खुशाल पोरटे, दिलीप चुधरी, खुशाल लोणारे, प्रल्हाद गेडाम, योगाजी गेडाम, देवराव मेश्राम, एकनाथ सिडाम, दिनाजी भोयर, चरणदास पिपरे, वासुदेव गेडाम, देवानंद कुमरे, हितेश निकुरे, बाजीराव निकुरे, अनिल गेडाम यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मुंडन केले.
संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, पूर पीडितांना रबी हंगामात तत्काळ बियाणे पुरविण्यात यावे, पूरग्रस्तांनी घेतलेले पीक कर्ज माफ करण्यात यावे इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यात प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, हरबाजी मोरे, प्रमोद भगत, कविता भगत, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, वसंत राऊत, ढिवरू मेश्राम, अब्दुल पंजवाणी, सुभाष धाईत, जितेंद्र मुनघाटे, निशा आयतुलवार,जावेद खान, दिलीप भांडेकर उपस्थित होते.