/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१७: अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अत्याचार केल्याची घटना आरमोरी शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एजाज पठाण (२९) यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१४ वर्षीय पीडित मुलगी आरमोरी येथे आपल्या कुटुंबीयांसह राहते.आरोपी एजाज पठाण हादेखील तिच्या घराशेजारीच राहतो.यामुळे दोघांची ओळख होती. नेमकी हीच संधी साधून आरोपीने पीडितेशी मैत्री करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वर्षभर तो तिच्यावर अत्याचार करीत राहिला.
मात्र, हा प्रकार मुलीच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी १४ नोव्हेंबरला पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी चौकशीअंती आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा प्रकरणाचा तपास करीत आहेत.