/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१४: शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी यांच्याशी निगडित समस्या, तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कमिटीतर्फे आज गडचिरोली येथून पायदळ मोर्चास सुरुवात झाली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येत आहे. आरमोरी, ब्रम्हपुरी, नागभिड, भिवापूर, उटी, उमरेड अशा विविध ठिकाणी मोर्चेकरी प्रत्येक दिवशीच्या रात्री मुक्काम करणार आहेत. या ठिकाणांहून काँग्रेस कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार असून, २१ डिसेंबरला हा मोर्चा नागपूरच्या विधीमंडळावर धडकणार आहे.
मोर्चाच्या शुभारंभाप्रसंगी माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी नगरसेवक राजेश कात्रटवार, रमेश चौधरी, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे,ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, शिक्षक सेलचे अध्यक्ष देवाजी सोनटक्के, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, गडचिरोली तालुकध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, धानोरा तालुकाध्यक्ष परसराम पदा, भामरागड तालुकाध्यक्ष लक्षमीकांत बोगामी, मुलचेरा तालुकध्यक्ष प्रमोद गोटेवार, सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश जवाजी,एटापली युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मोहन नामेवार, दिलीप घोडाम, अब्दुल पंजवाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.