शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

७५ हजारांची लाच मागणारा सरपंच अटकेत

Friday, 13th January 2023 08:17:26 AM

गडचिरोली,ता.१३: सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी एका कंत्राटदाराकडून तब्बल ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंचास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. मारोती रावजी गेडाम(५०) असे आरोपी सरपंचाचे नाव असून, तो धानोरा तालुक्यातील मुरगाव येथील सरपंच आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा बांधकाम कंत्राटदार असून, त्याने मुरगाव ग्रामपंचायतींतर्गत कोकडकसा येथील समाजमंदिर ते साधू पदा यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम केले. परंतु देयकाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याकरिता सरपंच मारोती गेडाम याने कंत्राटदारास ९० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो ७५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. मात्र, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून आज सरंपच मारोती गेडाम यास कंत्राटदाराकडून ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रंगेहाथ पकडून अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, हवालदार नत्थू धोटे, राजू पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, स्वप्नील बांबोळे, किशोर जौंजाळकर, संदीप घोरमोडे, किशोर ठाकूर, संदीप उडाण, विद्या म्हशाखेत्री, जोत्स्ना वसाके, तुळशीराम नवघरे आदींनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
50RI9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना