/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१५: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मोटारसायकलने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. ही घटना आज संध्याकाळी ७ वाजता कुरखेडा येथील गोठणगाव टी पॉइंटवर घडली. दिलीप कुमोटी(३५)रा.अंगारा, ता.कुरखेडा असे मृतांपैकी एकाचे नाव असून, दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
कुरखेडा येथील गोठणगाव टी पॉइंटवर रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा होता. संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास गोठणगावकडून कुरखेड्याकडे येणाऱ्या मोटारसायकलने ट्रकला जबर धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघेही ठार झाले. हे दोघेही शिवणी येथे तेंदूपानांचे पुडे भरण्यासाठी गेले होते. काही कामानिमित्त ते कुरखेड्याला जात असताना अपघात झाला. अपघातस्थळी एक मोबाईल सापडला. मात्र, तो लाँक असल्याने कुणालाही संपर्क साधता आला नाही. कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.