शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू

Sunday, 4th February 2024 01:26:21 AM

गडचिरोली,ता.४: येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या डीपीवर वीज दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने महावितरण कर्मचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. जितेंद्र वसंतराव गज्जलवार(३५) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

आज सकाळी चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कूलजवळच्या डीपीवर जितेंद्र गज्जलवार यांच्यासह महावितरणचे अन्य दोन कर्मचारी वीज दुरुस्तीसाठी आले होते. दोन कर्मचारी खाली होते, तर जितेंद्र गज्जलवार हे डीपीवर चढून दुरुस्ती करीत होते. एवढ्यात अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने त्यांना जोरदार धक्का लागला. ते खाली पडल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.

जितेंद्र गज्जलवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील बोदली(हिरापूर) येथील मूळ रहिवासी असून, त्यांना पत्नी व लहान मुलगा आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वीज पुरवठा बंद असताना अचानक तो कुणी आणि कुणाच्या आदेशावरुन सुरु केला, याविषयी चौकशी करण्याची मागणी केली जात आहे

 …………………..


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4P5Q8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना