शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कठाणी नदीच्या पुलावर अपघात: ट्रकच्या धडकेत दूधविक्रेता ठार

Monday, 5th February 2024 01:52:19 AM

गडचिरोली,ता.५: गडचिरोली शहरात दूध विक्री करून गावी परत जाताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने दूध विक्रेता जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहरानजीकच्या कठाणी नदीच्या पुलावर घडली.

मारोती भोयर (५५), रा. महादवाडी ता. गडचिरोली असे मृताचे नाव आहे. भोयर हे शेतीसह दुग्धव्यवसायही करायचे. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी गडचिरोलीत आले. ग्राहकांना दूध वाटप केल्यानंतर त्यांनी गुरांसाठी पशुखाद्य खरेदीकेले. त्यानंतर खाद्य आणि दुधाच्या केटल्या घेऊन ते मोटारसायकलने गावी परत जात होते. मात्र, आरमोरी मार्गावरील कठाणी नदीच्या पुलावर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यानंतर मारोती भोयर हे खाली कोसळले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने  त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. घटनेनंतर चालकाने ट्रक तेथेच ठेवून पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत असून, त्यांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

……………………

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
140V0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना