शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ

Friday, 1st March 2024 07:00:50 AM

गडचिरोली,ता.१: मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मार्कंडादेव येथील मंदिरांच्या जीणोद्धाराच्या कामाचा शुभारंभ खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आज करण्यात आला. भजन दिंडी काढत पूजा-अर्चा करुन मंगलमय वातारणात हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी सुनील शास्त्री महाराज, मुरलीधर महाराज, भारतीय पुरातत्व विभागाचे विभागीय अधीक्षक अरुण मलिक, अतिरिक्त अधीक्षक आलोक त्रिपाठी, उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार प्रशांत धोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, शहराध्यक्ष सोपान नैताम, जिल्हा सचिव दिलीप चलाख, कामगार आघाडीचे प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण, गजानन भांडेकर, संजय पंदिलवार, माणिक कोहळे, भास्कर बुरे, रेवनाथ कुसराम, नरेश अल्सावार, नामदेव सोनटक्के, साईनाथ बुरांडे यांच्यासह गावकरी आणि भाविक उपस्थित होते.

मार्कंडादेव येथील मार्कडेश्वराचे मंदिर प्रचंड विलोभनीय असून, दगडावरील कोरीव शिल्प डोळ्यांचे पारणे फेडतात. दरवर्षी तेथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. काही वर्षांपूर्वी मार्कडेश्वराच्या मंदिर समुहातील काही मंदिरांची पडझड झाल्याने त्यांची डागडुजी आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाने घेतला होता. परंतु पुरातत्व विभागाच्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे मागील पाच-सहा वर्षांपासून काम रखडले होते. यासंदर्भात आठवडाभरापूर्वी मुरलीधर महाराजांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. शिवाय उपोषणही आरंभिले होते. त्यानंतर खासदार अशोक नेते यांनी नवी दिल्ली येथील पुरातत्व विभागाशी तातडीने पत्रव्यवहार केल्यानंतर नव्याने निविदा काढण्यात आल्या. आज खा.नेते यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.

तत्पूर्वी मार्कंडेश्वर मंदिराच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी, यासाठी उपोषणाला बसलेले मुरलीधर महाराज यांना खा.नेते यांच्या हस्ते लिंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K6A7G
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना