शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

छताचे प्लास्टर गळाल्याने चार विद्यार्थी जखमी

Friday, 25th July 2014 11:39:23 AM

एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी येथील घटना

गडचिरोली, ता.24 : एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या छताचे प्लास्टर गळाल्याने चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज (ता़.25) दुपारी घडलॣ सूरज रावजी वड्डे, रोशन भाऊजी मुंडा, कार्तिक गोविंदा मडावी व किर्तन दुलसा लेकामी अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी पहिल्या व दुस-या इयत्तेतील असून त्यांना एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे़

नेहमीप्रमाणे आज सकाळी 10 वाजता विद्यार्थी वासामुंडी येथील जिल्हा परिषद शाळेत आले़ काही क्षण वर्गात बसताच अचानक छत्ताचे प्लास्टर गळायला लागले़. यात उपरोक्त चार विद्यार्थी जखमी झाले़. त्यांना एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे़. वासामुंडी येथील शाळेचे छत आठ वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आले़ मागील चार-पाच दिवस सतत पाऊस पडल्याने छताचे प्लास्टर निघू लागले़. आज दुपारी विद्यार्थी वर्गात बसले असतानाच प्लास्टर कोसळले़. यामुळे चार विद्यार्थी जखमी झाले़. जिल्हा परिषद शाळांच्या अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. शिवाय नवीन इमारतीचे काम थातूरमातूर पद्धतीने होत असून, जिल्हा परिषदेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांना वाईट परिणाम भोगावे लागत आहेत़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
H7VXS
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना