शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कारवाई करणा-यांना काळे फासणार

Sunday, 27th July 2014 09:53:16 AM

सुरेंद्रसिंह चंदेल यांचा इशारा

 

गडचिरोली, ता. २७ : पानठेले उभारून स्वयंरोजगार करणा-या युवकांवर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिस धाडसत्र राबवून कारवाई करीत आहेत़ हे अन्यायकारक असून, यापुढे कारवाई केली तर संबंधितांना काळे फासू, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी दिला आहे.

श्री. चंदेल यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात रोजगाराचे कोणतेही साधन नाही. शासकीय नोक-या मिळत नसल्याने शेकडो बेरोजगारांनी पानठेले सुरू करून आपला उदरनिर्वाह करणे सुरू केले आहे़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने पथक तयार करुन पानठेला व्यावसायिकांवर धाड मारणे सुरु केले आहे. यामुळे शेकडो युवकांवर बेरोजगारीची पाळी आली आहे. पानठेलाधारकांवर कारवाई केल्यास कारवाई करणा-यांना काळे फासू, असा इशारा माजी जि. प. सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी पत्रकाद्वारे केला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QF4O4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना