शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली प्रेसक्लबची कार्यकारिणी जाहीर

Monday, 28th July 2014 05:37:31 AM

अनिल धामोडे अध्यक्ष, अरविंदकुमार खोब्रागडे सचिव

गडचिरोली, ता.२८: 25 जुलै रोजी गडचिरोली प्रेसक्लबची वार्षिक आमसभा मावळते अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार भवनात घेण्यात आली. यात गडचिरोली प्रेसक्लबची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रेसक्लबच्या अध्यक्षपदी अनिल धामोडे (देशोन्नती) तर सचिव म्हणून अरविंदकुमार खोब्रागडे (नवभारत) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कार्यकारिणीत उपाध्यक्ष मारोती मेश्राम (युगधर्म), सहसचिव जयन्त निमगडे (लोकशाही वार्ता), कोषाध्यक्ष विलास दशमुखे (गडचिरोली पत्रिका), सदस्य सुरेश पद्मशाली(प्रहार), सुरेश सरोदे(आकाशवाणी), शेमदेव चापले (युवा राष्ट्र दर्शन), नंदकिशोर काथवटे(तरुण भारत),सुरेश नगराळे(सकाळ), अविनाश भांडेकर(पुण्यनगरी), हेमंत डोर्लीकर(दैनिक भास्कर), महेश तिवारी (आयबीएन लोकमत) यांचा समावेश आहे. याच बैठकीत प्रेसक्लब पब्लिक लायब्ररीच्या अध्यक्षपदी हेमंत डोर्लीकर, तर सचिव म्हणून सुरेश सरोदे यांची निवड करण्यात आली. यात उपाध्यक्ष सुरेश नगराळे, सहसचिव नंदकिशोर काथवटे व कोषाध्यक्ष म्हणून अविनाश भांडेकर यांची निवड करण्यात आली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MJO6R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना