शनिवार, 16 डिसेंबर 2017
लक्षवेधी :
  डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित-कोलकाता येथील इंटरनॅशनल वाईल्डलाईफ एन्व्हार्नमेंट फिल्म फेस्टीवलमध्ये पुरस्कार प्रदान             शेतकरी कामगार पक्षाच्या बैलबंडी मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक             गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणूक-महाआघाडीचा दणदणीत विजय, भाजपप्रणित शिक्षण मंचचा दारुण पराभव             राज्यात गत वर्षभरात तब्बल १४ हजार ३६८ बालमृत्यू-विधानसभेत आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची माहिती             शेतकरी नष्ट व्हावा, असे सरकारला वाटते काय-विधीमंडळातील स्थगन प्रस्तावावर अजित पवार यांचा सरकारला सवाल           

लैंगिक शोषणप्रकरणी वाळू कंत्राटदार अजय येनगंटी यास अटक

Monday, 11th December 2017 07:06:40 AM

गडचिरोली, ता.११:एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अजय व्यंकटेश येनगंटी(४०)रा.अंकिसा याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलीचे वयाच्या १५ व्या वर्षी लग्न झाले. परंतु नवरदेव न आवडल्याने ती दुसऱ्याच दिवशी माहेरी परत आल...

सविस्तर वाचा »

जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाचा खून करणाऱ्या ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 8th December 2017 09:05:49 PM

गडचिरोली, ता.९ जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरुन वृद्धाचा खून करणाऱ्या ६ जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना भामरागड तालुक्यातील वटेली येथील आहे. तेथील रहिवासी मुन्शी झुरी आत्राम हा आजारी नागरिकांवर झाडपत्तीचा उपचार करीत होता. लोकही त्याच्याकडे उपचार...

सविस्तर वाचा »

दारुसाठी पत्नीस जीवंत जाळणाऱ्या नवरोबास जन्मठेपेची शिक्षा

Wednesday, 6th December 2017 08:20:15 AM

गडचिरोली, ता.६: दारु पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला जीवंत जाळणाऱ्या नवरोबास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुरेश सोमाजी भोयर रा.खुर्सा ता.गडचिरोली असे दोषी इसमाचे नाव आहे. ही घटना १४ जून २०१५ ची आहे. या दिवशी आरोपी सुरेश भोयर याने पत्नी सुचेता हि...

सविस्तर वाचा »

अवैध दारुविक्रेत्यास ३ वर्षांचा कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा

Tuesday, 5th December 2017 09:12:38 AM

गडचिरोली, ता.५: अवैधरित्या दारु विकणाऱ्या एका इसमास येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी ३ वर्षांचा साधा कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दीपक रमेश भुरले, र.हनुमान वॉर्ड, गडचिरोली, असे दोषी इसमाचे नाव आहे. ही घटना यंदाचीच आहे. १७ मार्च २०१७ रोजी पोलिसांनी दीपक भुरले याच्या...

सविस्तर वाचा »

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस १० वर्षांचा सश्रम कारावास

Thursday, 30th November 2017 09:33:53 PM

गडचिरोली, ता.१: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. तौशिफ हबीब शेख रा.जवाहर वॉर्ड, देसाईगंज, असे दोषी इसमाचे नाव आहे. तौशिफ शेखचा पीडित मुलीच्या घरापुढे पानठेला होता. १ जानेव...

सविस्तर वाचा »

नक्षल्यांनी केली कोतवालाची हत्या

Wednesday, 29th November 2017 10:10:57 PM

गडचिरोली, ता.३०: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(ता.२९)रात्री अहेरी तालुक्यातील दामरंचा उपपोलिस ठाण्यांतर्गत येरमनार येथील एका कोतवालाची गोळी घालून हत्या केली. रमेश पोचा रामटेके(४०) असे मृत इसमाचे नाव आहे. रमेश रामटेके हा शासकीय कोतवाल नव्हता, तर गावकऱ्यांनी ठेवलेला कोतवाल ...

सविस्तर वाचा »

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या बस चालकास ४ वर्षांचा सश्रम कारावास

Wednesday, 29th November 2017 07:02:18 AM

गडचिरोली, ता.२९: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस विशेष सत्र न्यायालयाने ४ वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. गुरुदीप मिट्टूलाल मजोके, रा. किसाननगर, ता.सावली, जि.चंद्रपूर असे दोषी इसमाचे नाव असून, तो गडचिरोली आगारात बसचालक म्हणून कार्यरत आहे. सविस्तर वृत्त ...

सविस्तर वाचा »

भिकाऱ्याचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

Wednesday, 29th November 2017 06:39:56 AM

गडचिरोली, ता.२९: मोबाईल गायब केल्याच्या संशयावरुन एका भिकाऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शंकर ठेंगरी असे दोषी इसमाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, २६ जुलै २९१५ रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अब्दूल कादीर सत्तार श...

सविस्तर वाचा »

नक्षल्यांनी केली पुन्हा एका युवकाची हत्या?

Tuesday, 28th November 2017 08:21:14 AM

गडचिरोली, ता.२८: सशस्त्र नक्षल्यांनी एका युवकाची गळा चिरुन हत्या केल्याची घटना आज एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत झारेवाडा येथील जंगलात उघडकीस आली. मनोज राजू नरोटे रा.झारेवाडा, असे मृत युवकाचे नाव आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गट्टा जांभिया पोलिस ठाण्यापासू...

सविस्तर वाचा »

अंगावर वाहन चालवून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ८ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Tuesday, 28th November 2017 07:45:49 AM

गडचिरोली, ता.२८: लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन शाब्दीक चकमक उडाल्यानंतर संबंधित युवकाच्या अंगावर वाहन चालवून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने ८ वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विलास भैसारे असे दोषी इसमाचे नाव आहे. ही...

सविस्तर वाचा »
previous123456789...5455next

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : गडचिरोली जिल्हयातील गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे राज्य सरकार डोळेझाक करीत आहे, असे वाटते काय?
होय :
77%
नाही :
23%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना